‘मी मरतेय, माझा शोध घेऊ नका’ सायलीचे शेवटचे शब्द दुर्दैवाने खरे ठरले, आज…

बीड, 18 नोव्हेंबर : शहरातील गणेश नगर भागात राहणाऱ्या सायली कल्याण पारेकर (वय 16) असं मृत मुलीचं नाव आहे. सायली ही 16 नोव्हेंबरला पहाटे घरातून निघून गेली होती. घरातून बाहेर पडताना सायलीने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. “मी मरतीय, माझा शोध घेऊ नका व कोणालाच जबाबदार धरू नका” अशी नोट लिहून ठेवली होती. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलीचा मृतदेह एक विहिरीत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. बीडच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या गोविंदवाडी शिवारात ही घटना उघडकीस आली आहे.

सायलीची सुसाईड नोट आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तिच्या आई-वडिलांनी पोलिसांमध्ये धाव घेऊन सायली बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध घेतला होता. पण, कुठेही तिचा मृतदेह आढळून आला नाही.

अखेर आज सकाळी गोविंदवाडी शिवारात विहिरीत एका मुलीचा मृतदेह स्थानिकांना आढळून आला. स्थानिकांनी पोलिसांना तातडीने घटनेची माहिती दिली. हा मृतदेह सायलीचा असल्याचे समोर आले. सायलीचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकचं खळबळ उडाली आहे. सायलीने आत्महत्या केली की घातपात? असा सवाल उपस्थितीत झाला आहे.

सायलीने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास गेवराई पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!