डॉ. विक्रम सारूक माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी

बीड / प्रतिनिधी
बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी डॉ. विक्रम सारूक यांची नियुक्ती करण्याचे आदेश बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुमार यांनी दिले आहेत.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. विक्रम सारूक यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये केलेले कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी त्यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वीही डॉ. विक्रम सारूक यांनी माध्यमिक शिक्षण अधिकारी पदाचा कार्यभार अत्यंत चांगल्या प्रकारे सांभाळला होता. डॉ. सारूक यांची प्रभारी माध्यमिक शिक्षण अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल शिक्षण संघटनेने आनंद व्यक्त करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!