सोशल मीडिया वर व्हायरल होणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवल्याने अनेकांची फसवणूक झाली आहे. दरम्यान सध्या युट्यूबवर एक बातमी वेगाने व्हायरल होत आहे. या बातमीत असे म्हटले आहे की केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये आर्थिक मदतीसाठी 7 लाख रुपये ट्रान्सफर करत आहे.
‘जीवन लक्ष्य योजना’ सरकारकडून राबवली जात असून त्या अंतर्गत हे पैसे पाठवले जात असल्याचा दावा या बातमीत करण्यात आला आहे. दरम्यान ही संपूर्ण बातमी खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियावर नागरिकांना फसवण्यासाठी अशा अनेक बातम्या व्हायरल होत आहेत, याबाबत जागरुग राहणे नागरिकांचे कर्तव्य आहे.
काय आहे व्हायरल बातमी?
या व्हायरल झालेल्या बातमीत असे म्हटले आहे की, केंद्र सरकार ‘जीवन लक्ष्य योजने’अंतर्गत विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये 7 लाख रुपये पाठवत आहे. पीआयपी फॅक्ट चेकच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पीआयबीने असे म्हटले आहे की हा दावा पूर्णपणे खोटा आहे. सरकारची अशी कोणतीही योजना नाही आहे.
याआधी देखील अशीच एक खोटी बातमी व्हायरल होत होती. ज्यात असे म्हटले होते की, ‘केंद्र सरकारकडून मुलींच्या खात्यामध्ये दरमहा 2500 रुपये ट्रान्सफर केले जातात असं सांगितलं आहे. हा व्हिडीओ पूर्णपणे खोटा आहे. केंद्राने अशी कोणतीही योजना सुरू केलेली नाही. एका यूट्यूब व्हिडीओमध्ये कन्या सन्मान योजना या स्कीम अंतर्गत मुलींच्या खात्यामध्ये दर महिन्याला 2500 हजार रुपये भरले जातात असा दावा करण्यात आला. पण हा व्हिडीओ खोटा असून त्यावर सामान्य माणसांनी विश्वास ठेवू नये.’