बिहारच्या मुख्यमंत्री पदाची धुरा नितीश कुमारांकडेच; एनडीएच्या विधीमंडळ नेतेपदी निवड

Bihar Election 2020 : जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांची एनडीएचे विधीमंडळ नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. हा निर्णय एनडीच्या विधायक दलाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. आज संध्याकाळी नितीश कुमार राज्यपालांकडे बिहारमध्ये सत्ता स्थापन करण्याचा दावा करू शकतात. तसेच उद्या सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कुमार मोदी यंदा बिहारचे उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता कमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुशील कुमार मोदींना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. असं सांगितलं जात आहे की, सुशील मोदी यांना दुसरी जबाबदारी देत. उपमुख्यमंत्री पदाचा मान एखाद्या दुसऱ्या नेत्याला दिली जाऊ शकते. तर दुसरीकडे जेडीयूबाबत बोलायचं झालं तर त्यांचे आठ मंत्र्यांचा निवडणूकीत पराभव झाला आहे. त्यामुळे पक्षाला नव्या आमदारांचाही विचार करावा लागणार आहे. दरम्यान, बिहारच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर सोपवली जाणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

error: Content is protected !!