मुंबई | बिहार निवडणुकींच्या निकालांमध्ये नितीश कुमारांच्या जेडीयुला कमी जागा मिळाल्या आहेत. यानंतर अनेक विरोधकांनी नितीश कुमार यांना पुन्हा मिळणाऱ्या मुख्यमंत्रीपदावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
याच मुद्द्यावरून आता राजदने नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. राजदचे नेते मनोजकुमार झा यांनी नितीशकुमार बिहारचे मुख्यमंत्री कसे काय होऊ शकतात? असा सवाल केला आहे.
मनोजकुमार झा म्हणाले, “केवळ 40 जागा मिळालेल्या असताना या जागांच्या जोरावर नितीशकुमार बिहारचे मुख्यमंत्री कसे काय बनू शकतात? कारण बिहारच्या जनतेने दिलेला कौल हा नितीश कुमार यांच्या विरोधात आहे.”
मुळात या मिळालेल्या जागांचं नितीश कुमार यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. बिहारची जनता लवकरच दुसरा पर्याय शोधू शकते. कदाचित येत्या आठवडाभरात किंवा दहा दिवसात किंवा महिनाभरात बदल घडेल, असंही झा म्हणालेत.