मुंबई : मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. महामार्गावरील खालापूर टोलनाक्याजवळ वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर तीन ते चार किलोमीटरच्या लांबच-लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. दिवाळीमुळे मुंबई बाहेर जाणाऱ्या गाड्या वाढल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या एक तासापासून वाहनांची मोठी रांग पाहायला मिळत आहे.
मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूर टोलनाक्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. कारण दिवाळीच्या सुट्टीनिमित्त चाकरमानी बाहेर पडत आहेत. विशेषतः चाकरमानी दिवाळीचं लक्ष्मीपूजन आपल्या घरी केल्यानंतर आपल्या गावाकडे जातात. अशातच चाकरमान्यांनी आपल्या गावाकडची वाट धरली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या गाड्यांची गर्दी मुंबई-पुणे महामार्गावर झाली असून खालापूर टोलनाक्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूर टोलनाक्याजवळ वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या 3 ते 4 किमीपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दिवाळी साजरी करण्यासाठी मुंबईतील चाकरमानी आपापल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली झाली आहे. तसेच, महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली असून 3 ते 4 किमीपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे दिवाळीसाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जी नियमावली प्रशासनाच्या वतीने लागू करण्यात आली होती. ती आता शिथील झाली आहे. त्यामुळे लोकांचा प्रवासही वाढला आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्त चाकरमान्यांनी गावाची वाट धरली आहे. याचा ताण मुंबई-पुणे महामार्गावर आल्याचं चित्र दिसत आहे.