चुलत्या-पुतण्याचा नदीत करंट सोडून मासे पकडताना शॉक लागून मृत्यू


धारूर – धारूर तालुक्यातील काळ्याचीवाडी येथे घडली घटना धारूर तालुक्यातील काळ्याचीवाडी येथे नदीला पाणी असल्याने मोठ्या प्रमाणात मासे आहेत. मासे पकडण्यासाठी धारूर तालुक्यातील काळ्याचीवाडी येथे काल चुलत्या-पुतण्यांनी नदीत करंट सोडला होता. त्यानंतर ते मासे पकडण्यासाठी पाण्यात उतरले असता त्यांना शॉक लागल्याने यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला.


यावर्षी चांगला पाऊस पडल्याने नदी नाले ओसंडून वाहत आहेत. हे मासे पकडण्यासाठी सहदेव रुपनर (वय २३) व दीपक मारुती रुपनर (वय २२) या युवकांनी करंट सोडला होता. त्यानंतर ते मासे पकडण्यासाठी पाण्यात उतरले मात्र विद्युत प्रवाह सुरुच राहिल्याने त्यांना शॉक बसला. त्यात दोघांचा मृत्यू झाला. काल दोघेही मासे पकडण्यासाठी गेले होते. ते घरी परत न आल्याने कुटुंबियाने त्यांचा शोध घेतला असता त्यांचे मृतदेह पाण्यात आढळून आले. ऐन सणासुदीच्या तोंडावर ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी धारूर पोलिसांनी भेट देऊन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत.

error: Content is protected !!