बिहारमध्ये वाजणार भाजपच बिगुल

बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा निकालाच्या मतमोजणीला सुरुवात होऊन दोन तास उलटले आहेत. सुरुवातीला महागठबंधनची घोडदौड पाहायला मिळत होती पण आता मात्र भापजनं (BJP) मोठी उडी घेतली आहे. एनडीए’ने राजद-काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महागठबंधनला मागे टाकत बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. देशभरातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल आज (10 नोव्हेंबर) जाहीर होणार आहे.

बिहारमध्ये सुरूवातील महागठबंधनला बहुमत मिळाल्याचं दिसत होतं. यानंतर बिहार भाजप कार्यालयात हालचाल तीव्र झाल्या. मोठ्या प्रमाणात कामगारांची जमवाजमव सुरू झाली असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. इतकंच नाही तर बहुमताच्या दिशेने भाजप पुढे असल्याचं दिसताच पंतप्रधान नरेंद्र मोदी जिंदाबाद अशी घोषणाबाजी सुरू झाली आहे. यावेळी विरोधी पक्षाचा निषेधही करण्यात आला आहे.

बिहार निवडणुकीत जेडीयू नेते आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव हे राघोपूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत तर तेज प्रताप यादव हे हसनपूर मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. तर जेडीयूचे राज कुमार राय हेदेखील पुढे आहेत.

सध्याच्या आकडेवारीनुसार, एकूण 243 जागांपैकी 131 जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर महागठबंधन अवघ्या 96 जागांवर पुढे आहे. त्यामुळे एनडीए बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 122 जागा जिंकून बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्तास्थापन करेल, असे चित्र तुर्तास दिसत आहे.

तर दुसरीकडे या निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. सध्या भाजपचे उमेदवार 71 जागांवर आघाडीवर आहेत. तर भाजपपेक्षा अधिक जागा लढवणाऱ्या संयुक्त जनता दलाचे (जदयू) उमेदवार 52 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे आता बिहारमध्ये भाजप हा मोठा भाऊ होणार, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे आता ‘एनडीए’ची सत्ता आल्यास नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद देण्याचे वचन भाजप पाळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

error: Content is protected !!