PF खात्यातून पैसे काढण्यापूर्वी जाणून घ्या हे महत्त्वाचे नियम; अन्यथा भरावा लागेल टॅक्स

जर एखाद्या कर्मचाऱ्याने 5 वर्षांच्या कालावधीत आपला पीएफ काढला, तर त्याला ईपीएफ काढण्याच्या वेळी टॅक्स भरावा लागू शकतो. पण त्यासाठी काही अटी लागू आहेत. नोकरदार वर्गातील कर्मचारी आपली मोठी कमाई EPF मध्ये टाकतात. अनेकदा पैसे काढताना त्यावर टॅक्स लावला जातो. त्यासाठी टॅक्ससंबधित काही नियम जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अन्यथा, पीएफ (PF) अकाउंटमधील पैसे कट होऊ शकतात.

कसा वाचवाल TDS –

TDS आणि टॅक्सेबिलिटीपासून वाचायचं असल्यास, 5 वर्षांहून अधिक सर्व्हिस करावी लागेल. 5 वर्षांनंतर पैसे काढल्यास, कोणतीही टॅक्सेबिलिटी लागत नाही.

कधी काढाल EPF चे पैसे –

आपल्या EPF मधून 5 वर्षांनंतरच पैसे काढले पाहिजेत. जर 5 वर्षांआधीच 50 हजारहून अधिक रक्कम काढल्यास, त्यावर 10 टक्के टीडीएस (TDS) भरावा लागेल.

का लागतो TDS –

5 वर्षाआधी पैसे काढल्यास, एंप्लॉयरचं कॉन्ट्रिब्यूशन इनकम फ्रॉम सॅलरीमध्ये येतं. आणि एंप्लॉईचं कॉन्ट्रिब्यूशन इनकम फ्रॉम अदर सोर्सेजमध्ये जातं. त्यामुळे दोघांचं जे व्याज मिळतं, ते टॅक्सेबल होतं.

या फॉर्ममुळे वाचू शकतो TDS –

जर तुमचं इनकम 2.5 लाखांहून कमी आहे आणि तुम्ही PF मधून पैसे काढले असल्यास, फॉर्म 15GH सबमिट करू शकता. यामुळे TDS वाचवला जाऊ शकतो.

error: Content is protected !!