नागपूरची सर्व वाहनं पुढील 6 महिन्यात सीएनजी करा – नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन क्षेत्रात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतलाय. याचसंदर्भात त्यांनी नागपूर महापालिकेला सूचना केली आहे. नितीन गडकरी म्हणाले, “पुढच्या सहा महिन्यात नागपूर महानगरपालिकेकडे असलेली सर्व वाहनं सीएनजी करा. यामध्ये अगदी महापौरांच्या गाडीपासून ते कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांपर्यंत सर्व गाड्या सीएनजी कराव्यात.”

पर्यावरणाच्या दृष्यीने आणि आर्थिक नियोजनासाठी नितीन गडकरी यांनी नागपूर महालिकेला हा मोठा सल्ला दिला आहे. कोरोना संकटात नागपूर महानगरपालिका मोठ्या आर्थिक संकटात सापडलीये. मालमत्ता कर, पाणीपट्टी कर आणि बाजार नगररचना कर यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालीये. यामुळे पालिकेसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय.

error: Content is protected !!