Big breaking – बीड शहरातील LIC ऑफिसमध्ये भीषण आग

बीड : मध्यरात्री 2 च्या सुमारास शॉटसर्किटने लागलेल्या आगीत बीड शहरातील नगररोडवरील LiC कार्यालय जळून खाक झाले आहे. हे नुकसान एक ते दोन कोटीच्या पुढे असल्याची माहिती पुढे येत आहे.


बीड शहरातील एलआयसी ऑफिसला मध्यरात्री दोन च्या सुमारास भीषण आग लागली. सुरुवातील दुसरा मजल्यावर आग लागली.माहिती दिल्यानंतरही नेहमीप्रमाणे अग्नीशामक दल आग विझविण्यासाठी गाड्या लवकर न आल्याने दोन्ही मजले जळून खाक झाले. ब्रांच मॅनेजर यांच्या कॅबिनच्या बाहेर शॉटसर्किट होऊन ही आग सर्व कार्यालयात पसरली प्राथमिक माहिती भेटत आहे. दरम्यान सकाळी 7 च्या सुमारास ही आग विझविण्यात यश आले.

error: Content is protected !!