सातारा : ‘आई माझी काळूबाई’ मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड-अलका कुबला यांच्यातील वाद आता खासदार उदयनराजे भोसले यांच्यापर्यंत पोहोचला आहे. सातारा चित्रीकरणाच्या सेटवर प्राजक्ता गायकवाड यांची नेमकी वस्तुस्थिती अलका कुबल यांनी उदयनराजे भोसले यांच्यासमोर मांडली. यानंतर उदयनराजेंनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यासोबत मोबाईलवरून चर्चा करुन हा वाद लवकरात लवकर मिटवावा, अशी विनंती केली.
काही संघटनांनी अभिनेत्री अलका कुबल यांनी प्राजक्ता गायकवाड यांची माफी मागावी आणि मालिकेतील प्रमुख कलाकार विवेक सांगळेला मालिकेतून काढून टाकावे. अन्यथा साताऱ्यात सुरु असलेलं मालिकेचं चित्रीकरण बंद पाडण्याची धमकी दिली आहे. यापार्श्वभूमीवर अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांनी आज उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली.