हैदराबाद: हैदराबादमधील एका मुलीनं IAS होण्याचं स्वप्न पाहिलं. यासाठी तिने मल्टिनॅशन कंपनीतील HRची नोकरी सोडली आणि घर सोडलं. अनेकवेळा प्रयत्न करूनही IAS परीक्षेत यशस्वी होता आलं नाही त्यामुळे निराशा आली. त्यातून या तरुणीसोबत जे घडलं ते खूपच भयंकर होतं. या तरुणीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही तरुणी आता कचरा गोळा करताना दिसत आहे. महत्त्वाकांशी आणि ध्येयानं झपाटलेल्या लोक कधी-कधी नैराश्येत जातात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या तरुणीचं नाव रजनी असं आहे. ही तेलंगनाची रहिवासी आहे. 23 जुलैला ती विचित्र अवस्थेत गोरखपूर ते तिवारीपूर ठाणा क्षेत्र परिसरात आढळून आळी होती. कचरापेटीजवळ फेकलेलं अन्न ही तरुणी खात असताना या तरुणीचा फोटो व्हायरल झाला आणि त्यानंतर याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या तरुणाची माहिती विचारली असता तिने इंग्रजी बोलायला सुरुवात केली.
इंग्रजी उत्तम आणि हिंदी तोडकं मोडकं बोलायला येत होतं. पोलिसांनी याची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. या तरुणीला मातृछाया चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वाधीन केले. जिथे तीन महिन्यांपर्यंत मुलीवर उपचार करण्यात आले. या सगळ्यातून हळूहळू जेव्हा मुलीची मानसिक स्थिती नीट होऊ लागली तेव्हा तिने कुटुंबाविषयी माहिती सांगितली. 8 महिन्यांपूर्वी आपण घरसोडून आली असल्याचंही या तरुणीनं कबूल केलं.
2000साली या तरुणीनं एमबीए पूर्ण केलं होतं. IAS होण्याचं तिचं स्वप्न होतं. त्यासाठी तिने लाखो रुपयांची नोकरी सोडली. दोन वेळा परीक्षा दिला मात्र दोन्ही वेळा पदरात अपयश आणि नैराश्य आलं. हळूहळू हे नैराश्य वाढत गेलं. यातून बाहेर पडण्याठी तिने HRची नोकरी स्वीकारली पण काही महिन्यातच ती नोकरी आणि घर सोडून बाहेर पडली. त्यानंतर वडिलांनी देखील तिला शोधण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या तरुणीची माहिती कुटुंबियांना दिली आहे. पूर्णपणे बरी झाल्यानंतर तिला तिचे वडील मातृछाया चॅरिटेबल फाउंडेशनच्या सेंटरमधून घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.