काही कामं उरली नसल्याने नारायण राणे आता पुड्या सोडण्याचं काम करतात – राज्यमंत्री अब्दूल सत्तार

सावंतवाडी | भाजप नेते नारायण राणे सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसतात. तर यानंतर आता राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला आहे.

सावंतवाडीतील आंबोलीमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना सध्या काय काम उरलं नाहीये, त्यामुळे ते पुड्या सोडण्याचं काम करतायत.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर नारायण राणे ज्या भाषेत टीका करतायत ती भाषा निषेधार्थ आहे. शिवाय ही भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही, असंही त्यांनी सांगितलंय.

सत्तार पुढे म्हणाले, “महाविकास आघाडीचं सरकार हे 32 तारखेला पडेल. त्यामुळे त्याची भाजपने वाट बघावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांना विश्वासात घेऊन चांगलं काम करत आहेत. यामुळे भाजपमधील काही जणं खासगीतही मुख्यमंत्र्याचं कौतुक करतात. त्यामुळे आमच्या सरकारला पाच वर्षे भीती नाहीये.”

error: Content is protected !!