किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध 99 धावांवर बाद झाल्याने संतापलेल्या फलंदाज ख्रिस गेलने आपली बॅट फेकली. ज्यामुळे त्याला दंड बसला आहे.
हे वाचा : सावधान ! भगवानगडाच्या पायथ्याशी बिबट्या आढळला
मॅच फीच्या 10 टक्के दंड त्याला बसला आहे. आयपीएल व्यवस्थापनाने ज्या घटनेबद्दल दंड ठोठावला आहे, त्याविषयी त्यांनी काहीही सांगितले नाही, परंतु असे मानले जाते की 99 धावा देऊन बाद झाल्यावर बॅट फेकल्यामुळेच त्याला हा दंड दिला गेला. त्याने हा गुन्हा मान्य केला आहे. 20 व्या ओव्हरमध्ये गेलला जोफ्रा आर्चरने 99 धावांवर बोल्ड़ केलं होतं.
आयपीएलने एका निवेदनात म्हटले आहे की, “राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज ख्रिस गेलला आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल सामना शुल्काच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांने चूक स्वीकारली आहे. अशा चुकांमध्ये मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि स्वीकार्य आहे.’