गावाने घेतली धास्ती, शिरढोण येथे घडली धक्कादायक घटना

शिरढोण (ता. शिरोळ) येथील तीन सख्ख्या भावांचा आठवडाभरात कोरोनाने बळी घेतला. सुरुवातील एका भावाला खोकला व ताप आल्याने आयजीएममध्ये दाखल केले. तेथे ते कोरोना पॉझिटिव्ह आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आठवडाभरातच मधल्या भावाला त्रास जाणवू लागला.

हे वाचा : बर्गर ऑनलाइन मागवणं पडलं महागात…

उपचारासाठी नेत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुर्दैव म्हणजे दुसऱ्याच दिवशी लहान भावाचा मिरज येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. तिघांनाही कोरोनाची बाधा झाली होती. दरम्यान, कुटुंबातील तिघांचा कोरोनाने बळी घेतला तरी आरोग्य विभागाने गांभीर्य दाखविले नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालिघाटे यांनी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. तहसीलदार अपर्णा मोरे यांनी चौधरी कुटुंबीयांची भेट घेतली आरोग्य विभागाला उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. चौधरी कुटुंबातील व संपर्कातील २६ जणांचे स्वॅब घेतले.

error: Content is protected !!