लॉकडाऊनच्या तयारीत आहेत ‘हे’ ३ देश ; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर

युरोपमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. परिस्थिती नियंत्रणात नसल्याचे पाहून ब्रिटन, जर्मनी, फ्रान्ससह युरोपमधील अनेक देश पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या तयारीत आहेत. जर्मनीने रेस्टॉरंट्स आणि बार पुन्हा एका महिन्यासाठी बंद करण्याचा आदेश दिले आहेत. जगभरात दररोज कोरोना विषाणूच्या प्रसाराचे प्रमाण वाढत आहे.

हे वाचा : आता या नवीन टायटलने रिलीज होणार अक्षय चा laxmi bomb

जर्मन चांसलर अँजेला मर्केल यांनी हे निर्बंध अधिक कठोर करण्यासाठी जर्मनीच्या उच्च अधिकारीवर्गाशी चर्चा केली आहे. त्याचबरोबर फ्रान्समध्ये दिवसाला 50 हजाराहून अधिक रुग्णसंख्येनंतर अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देशाला संबोधित करताना कोरोनासंदर्भात नवीन नियम व निर्बंधासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात युरोपात कोरोनाचे प्रमाण 37 टक्के वाढले आहे. 1.3 दशलक्ष नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. असे म्हटले जात आहे की युरोपमधील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने कहर सुरू केला आहे. ब्रिटनमध्ये एका आठवड्यात कोरोना विषाणूचे प्रमाण वाढले आहे. त्यानंतर अनेक शहरांमध्ये कडक बंद जाहीर करण्यात आला आहे. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने वेल्स, ग्रेटर मँचेस्टर, लिव्हरपूल सिटी, लँकशायर, साउथ यॉर्कशायर आणि स्कॉटलंड या शहरात लॉकडाऊन केलं असून या ठिकाणी लोकांना घर सोडण्याची परवानगी नाही.

आरोग्य तज्ञांचा असा अंदाज आहे की हिवाळा आल्यानंतर कोरोना विषाणू भयानक रूप धारण करू शकतो. त्याचा परिणाम आता युरोपमध्येही दिसू लागला आहे. अलीकडे युरोपमध्ये 2,05,809 नवीन कोरोना रुग्ण दिसून आले आहेत. फ्रान्समधून सर्वाधिक 45 हजार आणि ब्रिटनमध्ये 23 हजार रुग्ण समोर आले आहेत. युरोपमध्ये गेल्या एका आठवड्यात कोरोना रुग्णांमध्ये तब्बल 37 टक्के वाढ झाली आहे.

युरोपमधील बर्‍याच देशांमध्ये दुसर्‍या कोरोना लाट लक्षात घेता नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बेल्जियमने सर्व बार, हॉटेल्सना नवीन निर्बंधांचे आदेश दिले आहेत. रेस्टॉरंट्स सोमवारपासून जवळपास एक महिना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत, तर इटलीने लोकांना घराबाहेर पडण्यासाठी मास्क वापरण्याचे आदेश दिले आहेत. सहा वाजल्यानंतर येथे बार आणि रेस्टॉरंट बंद होतील .फ्रान्समध्ये सकाळी 9 ते सकाळी 6 या वेळेत 9 मोठ्या शहरांमध्ये कर्फ्यू आहे. अनावश्यक कारणासाठी बाहेर जाण्यासाठी दंड देखील भरावा लागू शकतो. जर्मन चांसलर अँजेला मर्केल यांनी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले. त्याच वेळी ब्रिटनमधील बर्‍याच शहरांमध्ये कडक लॉकडाउन करण्यात आलं आहे.

error: Content is protected !!