महिनाभर कौतुक करता अन् एका दिवसात उतरून टाकता; मानलं पवार साहेब !

मुंबई: गेल्या ३० वर्षांपासून मी शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकत आलो आहे. प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या विधानावरुन वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं. शरद पवारांच्या या विधानावरुन आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

हे वाचा : शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेत व्यत्यय

राज्यात एकहाती शिवसेनेचा भगवा फडकवण्यास सज्ज राहा, आत्तापासूनच तयारीला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले होते. बुधवारी झालेल्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हे विधान केलं होतं. उद्धव ठाकरेंच्या या विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता.

निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, मानलं पवार साहेब आपल्याला.. महिनाभर कौतुक करता आणि एका दिवसात वर्षभराची उतरून टाकता. पवार साहेबांनी एका वाक्यात कान टोचले, अशी टीका निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

error: Content is protected !!