विद्यापीठाने अंतिम सत्र, वर्षाच्या परीक्षांना मंगळवार (ता. २७) पासून सुरुवात झाली. आज बी. फार्मसी सत्र आठमधील एका विषयाचा पेपर बुधवारी दुपारी दीड ते अडीच या वेळेत होता. ऑनलाईन पद्धतीने पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटच्या दहा मिनिटांमध्ये ॲटो लॉगआऊट या तांत्रिक समस्येला तोंड द्यावे लागले. अचानकपणे ही समस्या निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
शिवाजी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा काल झाल्या. बी. फार्मसी या अभ्यासक्रमाच्या पेपरवेळी शेवटची दहा मिनिटे उरलेली असताना अचानक प्रश्नपत्रिका ॲटो लॉग आउट झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवून सबमीट करता आली नाही. याबाबत विद्यापीठाला कळवल्यावर विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिला. मात्र, या प्रकारामुळे परीक्षेत काही काळासाठी व्यत्यय आला.
हे वाचा : काळजी घ्या… कोल्हापूरात आणखी एका संकटाचे सावट
काही विद्यार्थ्यांनी त्याबाबतची माहिती विद्यापीठाला कळविली. त्यानंतर विद्यापीठाने तातडीने कार्यवाही करत ही समस्या दूर केली. त्यामध्ये जितका वेळ व्यतित झाला. तितका वेळ पेपर सोडविण्यासाठी परीक्षार्थींना वाढवून देण्यात आला. दरम्यान, या समस्येबाबतचे माहिती देणारे दूरध्वनी दुपारी सव्वादोनच्या सुमारास आले. त्यावर ही तांत्रिक समस्या तातडीने दूर केली. विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिली, अशी माहिती परीक्षा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
दुसऱ्या दिवशी ११६५७ जणांची परीक्षा
बुधवारी बी. ई. एमएसडब्ल्यू., एमआरएस., बी. व्होक, एमबीए (रूरल मॅनेजमेंट), बी. फार्मसी, बी. टेक, बी. टेक्सटाईल, बॅचलर ऑफ ड्रेस मेकिंग अँड फॅशन को-ऑर्डिनेशन, बॅचलर ऑफ डिझाईन, बी. लिब., एम. लिब., बीजेसी., बी. आर्किटेक्चर, बी. व्होक या अभ्यासक्रमांच्या परीक्षा झाल्या. ११,५२१ विद्यार्थ्यांपैकी ११५०० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा दिली. १५७ विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली.