CSK नं या हंगामात 11 सामन्यांपैकी 8 सामने गमावले आहेत, तर केवळ 3 सामन्यात विजय मिळवला आहे. यामुळे आता धोनीच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
गेल्या 12 वर्षात दरवर्षी प्ले ऑफ गाठणारा संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज. मात्र यावेळी एक वेगळाच प्रकार दिसला. CSK चा संघ सध्या गुणतालिकेत तळाशी आहे. त्यामुळे धोनीच्या नेतृत्वाखाली यंदा CSK चं प्ले ऑफ गाठण्याचं स्वप्न भंगलं आहे.
हे वाचा : धक्कादायक : चालत्या कारमध्ये बलात्कार
मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईला 10 विकेटनं पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर धोनीच्या आयपीएल निवृत्तीच्या चर्चा समोर आल्या आहेत. एक फोटो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर चाहत्यांच्या मनात ही आयपीएल धोनीची शेवटची स्पर्धा असून शकते. याआधी धोनीनं 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यानंतर धोनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही.(sports news)