आयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिल्यांदा चेन्नई सुपरकिंग्जचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईला 10 विकेटनं पराभव मिळवावा लागला आणि याचबरोबर प्ले ऑफ गाठण्याचं स्वप्न भंगल.
हे वाचा : रोहित पवारांनी समाजकारण नाही तर धंदा केला
चेन्नई सुपरकिंग्ज , म्हणजे प्ले ऑफ गाठणारा संघ असं काहीसं समीकरण गेल्या 12 वर्षात झालं होतं. मात्र 2020 मध्ये काय घडेल आणि काय नाही याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. तसाच काहीसा प्रकार आयपीएलमध्येही घडला.
CSKनं या हंगामात 11 सामन्यांपैकी 8 सामने गमावले आहेत, तर 3 सामन्यात विजय मिळवला आहे. CSKचे आता तीन सामने शिल्लक आहे, या सामन्यात विजय मिळवूनही त्यांना प्ले ऑफ गाठणं शक्य होणार नाही. तर, मुंबई इंडियन्सचा संघ पुन्हा अव्वल स्थानी आला आहे.