आता रशियानंतर आणखी एका देशाच्या 2 कोरोना लशी सज्ज आहेत. याच वर्षात या लशींना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. रशियाने (Russia)आपल्या दोन कोरोना लशींना मंजुरी दिली आहे. आपली तिसरी लसही तयार असल्याचा दावा रशियाने केला आहे.
आता अमेरिकेतील (united state)फायजर (pfizer) कंपनीची लस आणि मॉडर्ना इंक कंपनीची लस तयार झाली आहे. फायजर कंपनीच्या लशीत जर्मन कंपनी BioNTech ची भागीदारी आहे. लशीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळावी यासाठी अर्ज केला जाणार आहे.
या लशीची सध्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. ज्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.लशीची सुरक्षितता आणि प्रभाव समजल्यानंतर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात या लशीला मंजुरी मिळण्यासाठी अर्ज केला जाणार आहे.
यूएस (united state) अन्न आणि औषध प्रशासनाकडे अर्ज केला जाणार असल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.मॉडर्ना कंपनीच्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकिल ट्रायलचे सकारात्मक परिणाम नोव्हेंबरमध्ये येण्याचा अंदाज आहे. जुलैमध्ये 30000 लोकांवर या लशींचं ह्युमन ट्रायल सुरू करण्यात आलं होतं. सकारात्मक परिणाम आल्यानंतर डिसेंबरमध्येच या लशीच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली जाऊ शकते, असं मॉडर्ना इंक कंपनीचे सीईओ स्टिफन बँसेल यांनी सांगितलं.