‘आयटम’, अशी भाषा चालणार नाही

कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवार आणि माजी मंत्री इमरती देवी यांच्याबद्दल ‘आयटम’ शब्द वापरल्यामुळे देशभर वाद निर्माण झाला होता. त्यावरून राहुल गांधी यांनी त्यांना ही समज दिली. राहुल हे सध्या आपला मतदारसंघ असलेल्या वायनाडच्या दौऱ्यावर आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात विचारलेल्या एका प्रश्नावर कमलनाथ यांच्याबद्दल राहुल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना मंगळवारी चांगलच फटकारलं.

हे वाचा : मोदी सरकारला रोहित पवारांनी सुनावलं

राहुल गांधी म्हणाले, कमलनाथ हे काँग्रेस पक्षाचे आहेत, मात्र अशा प्रकारची भाषा योग्य नाही. कुठल्याही नेत्याला अशी भाषा वापरणं हे चांगलं नाही. मला अशी भाषा वापरणे हे मुळीच आवडलेलं नाही. असं वक्तव्य हे दुर्दैवी आहे असंही ते म्हणाले. मध्य प्रदेशमध्ये सध्या पोट निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. एका प्रचारसभेत बोलताना कमलनाथ यांनी वादग्रस्त वक्तव्य दिलं होतं.

मध्य प्रदेशात पोटनिवडणुकीसाठी सध्या प्रचार सुरू आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांचा ‘आयटम’ असा उल्लेख केला होता. त्यावरून राजकारण तापलं असून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. इमरती देवी यांनी कमलनाथ यांच्यावर हल्लाबोल केलाय. कमलनाथ हे तर कलंकनाथ आहेत. मी त्यांना राक्षस समजते अशी टीका त्यांनी केली. एका प्रसार सभेत कलमनाथ यांनी ‘आयटम’ असा उल्लेख केल्याने मध्य प्रदेशात वादळ निर्माण झालं होतं. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मौन आंदोलन करत याचा निषेध केला आहे.

इमरती देवी म्हणाल्या, कधी काळी कमलनाथ यांना मी मोठा भाऊ मानत होती. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी माझा अपमान केला होता. ते मुख्यमंत्री असताना आम्ही भेटायला गेल्यानंतर ते सगळ्यांना फटकारत असतं. त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत काहीही विकास केला नाही. मुख्यमंत्री पद गेल्याने कमलनाथ यांना वेड लागलं असून ते राज्यभर फिरत आहेत अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

कमलनाथ म्हणाले

अखेर एका सभेदरम्यान कमलनाथ यांनी सोमवारी त्या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, मी कोणाचा अपमान केला नाही. ते पुढे म्हणाले की, मी नाव विसरलो होतो. मात्र शिवराज सिंह चौहान निमित्त शोधत आहे. पण कमलनाथ कधी कोणाचा अपमान करीत ना

error: Content is protected !!