प्रियकरासोबत पळून जाणाऱ्या पत्नीचा खेळ खल्लास

इंदौर, 07 ऑगस्ट : पत्नीचे अवैध संबंध असल्यानं प्रियकरासोबत सारखी पळून जाणाऱ्या पत्नीचा खेळ संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या हत्येनंतर या तरुणानं अख्खी रात्र आपल्या पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून काढली. हा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील इंदौर इथल्या बेटमा परिसरात घडला आहे.

पतीनं आधी पत्नीला झोपेची गोळी दिली आणि त्यानंतर अवैध संबंध असल्याच्या रागातून गळा दाबून हत्या केली. आपल्या पत्नीच्या मृतदेहासोबत पतीनं अख्खी रात्र काढली. सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने पत्नीचा मृत्यू झाल्याचं सांगून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा संपूर्ण कट रचणाऱ्या पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पत्नीच्या हत्येचा कट कसा झाला उघड

संजू राजपूतने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती बेटमा पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर लक्षात आलं की नातेवाईकांनी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत. या घटनेदरम्यान संजूच्या पतीची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर संजूचा (पत्नी) मृत्यू होण्याची दोन वेगवेगळी कारण काही अंतरानं त्यानं दिल्यानं फसला. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केल्यावर संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

3 ऑगस्ट रोजी कारण काढून पत्नी प्रियकरासोबत पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पती दिलीप सिंह याला मिळाली. त्यानं पत्नीचा पळून जाण्याचा डाव उधळून लावला आणि घरातील एका खोलीत बंद करून ठेवलं. पत्नी पळून गेली तर समाजात आपली इज्जत आणि तिला मिळणारी जमीन दोन्ही गोष्टी जातील या हेतूनं त्यानं मारण्याची योजना आखली.

रात्रीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळून ते जेवण दिलं आणि मध्यरात्रीच्या सुमारास गळा दाबून हत्या करण्यात आल्याची कबूला अखेर दिलीप सिंह याने पोलिसांना दिली. या प्रकरणी कट रचणे आणि हत्ये करण्याच्या आरोपाखाली दिलीपवर गुन्हा दाखल केला असून बेड्या ठोकल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!