औरंगाबाद दि 16 : तक्रारदार हे त्यांचे प्लॉट वर बांधकाम करत असतांना, त्यांना बांधकाम करण्यास मनाई व शिवीगाळ करणारे लोका विरोधात तक्रारदार यांनी पोलीस आयुक्त, औरंगाबाद यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता, सदर तक्रार अर्ज आरोपी भास्कर रामजी खरात, वय 57 वर्ष, सहायक फौजदार, सध्या नेमणूक- पोलीस ठाणे मुकुंदवाडी, औरंगाबाद शहर हा पोलीस ठाणे एम आय डी सी वाळूज येथे नेमणुकीस असतांना त्याच्याकडे चौकशी कामी देण्यात आलेला होता. तक्रारदार यांनी आरोपी सहाय्यक फौजदार याच्याकडे त्यांचे प्लॉटचे मालकी हक्क सांगणारे इसमांचे कागदपत्राच्याच्या झेरॉक्स प्रति देण्यासाठी एक नवीन रेडमी कंपनीचा नोट 9 मोबाइल ची लाचेची मागणी करून, सदर मोबाईल किंमत 14500/- ₹ लाच म्हणून स्वीकारल्या नंतर त्याला रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई डॉ राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, डाॅ. अनिता जमादार, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी गणेश धोक्रट, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद यांनी पोना. विजय बाम्हंदे, सुनील पाटील, अरुण उगले, मिलिंद इपर, पोशि चागंदेव बागुल यांचे सहकार्याने केली.