दिनेश कार्तिकने सोडले केकेआरचे कर्णधारपद

IPL 2020 : कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कर्णधार पदाचा कर्णधार दिनेश कार्तिकने (dinesh kartik) राजीनामा दिल्यानंतर कोलकात्याचे नेतृत्व इंग्लडचा स्टार फलंदाज इयॉन मॉर्गनकडे सोपवण्यात आल्याची माहिती कोलकात्याच्या संघ व्यवस्थापनाने दिली आहे.

हे वाचा : काळजी घ्या…आणखी एक करोना संसर्ग फैलावण्याची भीती !

केकेआर व्यवस्थापनाला दिनेश कार्तिकने माहिती देताना अशी इच्छा व्यक्त केले की, फलंदाजीवर लक्ष केंद्रित करून संघाच्या कार्यात अधिक योगदान द्यावे या उद्देशाने त्याने इयॉन मॉर्गनकडे कर्णधारपद सोपवावे. दरम्यान संघ व्यस्थापनाने म्हटले आहे की, आम्ही दिनेश कार्तिकने घेतलेल्या निर्णयाचा सन्मान करतो आणि असा निर्णय घेण्यासाठी खूप मोठे धैर्य असावे लागते.

आम्हाला त्याच्या या निर्णयामुळे आश्चर्य वाटले तरी त्याच्या इच्छेचा आदर आम्ही करतो. तसेच इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार इयॉन मॉर्गन जो यापूर्वी संघाचा उपकर्णधार होता, तो आता संघाचे नेतृत्व करणार आहे हे आमचे भाग्यच असल्याचे कोलकाता नाइट रायडर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2020) कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी साधारण राहिली असून प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. आता इंग्लिश कर्णधार इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली संघाचे नशीब बदलते का हे आगामी काही दिवसातच स्पष्ट होईल.

error: Content is protected !!