पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गोळीबार, शहरात खळबळ

पुणे आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी एकावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या एसबीआयच्या ट्रेझरीजवळ हा प्रकार घडला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली व्यक्ती बांधकाम व्यावसायिक असल्याचे समजते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. गुन्हे शाखेचे अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात काही चित्रण कैद झाले आहे का? याबाबतची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

error: Content is protected !!