हाथरास रेप प्रकरण : पीडितेच्या भावाचा आरोप, जिल्हाधिकाऱ्याने वडिलांच्या छातीवर मारली होती लाथ

उत्तरप्रदेश – पीडित कुटुंबीयांचे सांत्वन आणि भेट घेण्यासाठी राजकीय पक्ष हाथरसमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे. पण, उत्तर प्रदेश पोलीस आणि हाथरस जिल्हा प्रशासन (Hathras District Administration) ने पीडितेच्या गावाला गेल्या 3 दिवसांपासून कडक पहारा लावला आहे. पीडितेचे कुटुंब गेल्या 3 दिवसांपासून घरात अडकून पडले आहे.

हे वाचा : अजित पवारांनी यांना दिली माहिती न लपवण्याची तंबी

उत्तर प्रदेशमधील हाथरस (Hathras) सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावरून एकीकडे राजकीय वातावरण तापले आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी पीडितेच्या गावाच्या सीमा बंद केल्या आहे. या परिस्थितीत पीडितेच्या भावाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

पीडितेच्या कुटुंबाने हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीण लक्षकार (Collector Praveen Lakshakar) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. प्रवीण लक्षकार यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्याकडून मोबाईल फोन हिसकावून घेतले.

पीडितेचा भाऊ पोलिसांचा पहारा चुकवून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीपर्यंत पोहोचला. शेतातून लपत-छपत हा मुलगा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना येऊन भेटला. त्यावेळी त्याने सांगितले की, ‘पोलिसांनी आमच्याकडून मोबाइल फोन हिसकावून घेतले. घरातून कुणालाही बाहेर येण्यास मनाई केली आहे. आमचे कुटुंबीय माध्यमांशी बोलू इच्छत आहे. पण, घरातून आम्हाला बाहेर येता येत नाही. पोलिसांनी घराबाहेर कडक बंदोबस्त ठेवला आहे. घरासमोर, रस्ते, शेतात पोलीस तैनात करण्यात आले आहे. याला विरोध केला असता डीएम प्रवीण लक्षकार यांनी पीडितेचे वडिलांच्या लाथ मारली होती. त्यामुळे ते बेशुद्ध पडले होते. त्यानंतर सर्वांना घरात बंद करण्यात आले.

दरम्यान, हाथरसमधील बलात्कार प्रकरणानंतर पोलिसांच्या भूमिकेवरून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच आता योगी सरकारकडून कडक पाऊल उचलत पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक यासह अन्य काही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

तर राज्य सरकारवर दबाव वाढल्याने मुख्यमंत्री योगी यांनी घोषणा करत आरोपींना कडक शिक्षा देण्याची घोषणा केली. ते म्हणाले, ‘उत्तर प्रदेशात आई-बहिणींकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा विचारही करणाऱ्यांचा समुळ नाश निश्चित आहे. अशा लोकांना अशी कडक शिक्षा करू की त्यामुळे कायद्याचा धाक निर्माण होईल. ही फक्त घोषणा नाही तर आमचं वचन आहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

error: Content is protected !!