अमेरिका – ही धक्कादायक घटना अमेरिकेत (America) घडली असून डॉक्टरांनी (Doctor) ही बाब गुरुवारी एका वैद्यकीय नियतकालिकेला सांगितली. या महिलेवर वेळीच उपचार झाले नसते तर तिच्या मेंदूतही संसर्ग झाला असता. करोना संसर्गासाठी (corona) करण्यात येणाऱ्या स्वॅब चाचणीमुळे (swab test) एका महिलेचे प्राण धोक्यात आले आहे. नाकातून स्वॅब जमा करताना ब्रेन लायनिंगला (brain problem)धक्का लागला आणि तिच्या नाकातून मेंदूचा फ्लूड बाहेर पडू लागला.
हे वाचा : युवा सेना नेत्याची राजकीय वादातून हत्या
४० वर्षीय महिलेला या आधीपासून आरोग्यविषयक त्रास होता. मात्र, तिला त्याबाबत माहिती नव्हती. करोना चाचणी करतानाही चूक झाल्यामुळे अपघात झाला. यामुळे स्वॅब चाचणी (swab test)करताना आणखी सावधानता बाळगण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. काही महिन्यांपूर्वी ही घटना घडली.
JAMA Otolaryngology-Head & Neck Surgery मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधन निबंधाचे वरिष्ठ लेखक जॅरेट वॉल्श यांनी सांगितले की, ज्यांचा सायनस मोठा आहे, किंवा कवटीशी संबंधित शस्त्रक्रिया झाली अशा व्यक्तींनी नाकाऐवजी ओरल टेस्टची मागणी करायला हवी.
वॉल्श हे लोवा विद्यापीठाच्या रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यांनी सांगितले की, या महिलेला इलेक्टिव हर्निया सर्जरी आधी नोजल चाचणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर तिच्या नाकातून क्लिअर फ्लूड बाहेर येत असल्याचे आढळून आले. त्यानंतर या महिलेला डोकेदुखी, उलटी होणे, अंधुक दिसणे, आदी विविध त्रास जाणवू लागला.
या महिलेला उपचारासाठी वॉल्श यांच्याकडे पाठवण्यात आले. आपली स्वॅब चाचणी योग्य प्रकारे घेतली नसल्याचे महिलेने सांगितले. या महिलेवर मागील काही वर्षांपासून इंट्राक्रॅनियल हायपरटेन्शनसाठी उपचार सुरू आहेत. याचा अर्थ असा की, मेंदूची सुरक्षा करणाऱ्या फ्लूडचा दबाव अधिक होता.
डॉक्टरांनी एक शंट लावून थोडा फ्लूड बाहेर काढला. त्यानंतर ही समस्या कमी झाली. मात्र, त्यामुळे encephalocele म्हणजे कवटी संबंधी त्रास झाला. यामध्ये मेंदूची लायनिंग नाकात पोहचते आणि त्यामुळे इजा होण्याचा धोका संभवतो. पहिल्यांदा स्कॅन करण्यात आले तेव्हा ही बाब लक्षात आली नव्हती. योग्य वेळीच उपचार झाले नसते तर मेंदूत बॅक्टेरिअल संसर्ग झाला असता.