आजही जग त्यांच्या अंहिसेच्या मार्गावर चालताना दिसते. महात्मा गांधींना ‘राष्ट्रपिता’ (Father Of The Nation) म्हणून संबोधले जाते हे तर सर्वांनाच माहिती आहे. मात्र सर्वांत प्रथम ही उपाधी त्यांना कोणी दिली तुम्हाला माहितीये ?
हे वाचा : बलात्काराच्या गुन्ह्यात उत्तरप्रदेश नव्हे तर महाराष्ट्र पुढे
महात्मा गांधींना (Mahatma Gandhi) सर्वात प्रथम ‘राष्ट्रपिता’ म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी संबोधित केले होते. 4 जून 1944 ला सिंगापूरच्या रेडिओवरून एक संदेश प्रसारित करत त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी असा उल्लेख केला होता. याशिवाय सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींच्या नावे पाठवलेल्या संदेशात राष्ट्रपिता असा उल्लेख केला असल्याचे सांगितले जाते.
सत्य आणि अहिंसेचे पुजारी असलेल्या महात्मा गांधींचे (Mahatma Gandhi)नाव इतिहासात नमूद आहे. जगाला अंहिसेचा मार्ग दाखवणाऱ्या या महात्म्याची भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठी भूमिका होती.
महात्मा गांधींना पाठवलेल्या संदेशात सुभाषचंद्र बोस (Subhashchandra Bose) यांनी लिहिले होते, ‘राष्ट्रपिता, हिंदच्या आजादीच्या या पवित्र युद्धात आपल्या शुभाशीष आणि शुभेच्छांची आम्ही याचना करत आहोत.’
नेताजी आणि महात्मा गांधी एकमेकांचा आदर करत असे. मात्र दोघांमध्ये वैचारिक मतभेद देखील होते. देशभरातील लोक महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणून संबोधित करत असले तरीही भारत सरकार अधिकृतरित्या गांधींजीना राष्ट्रपिता घोषित करू शकत नाही.
2012 साली 10 वर्षीय ऐश्वर्या पाराशर या मुलीने देखील गांधींजीना राष्ट्रपिता कोणी संबोधले ? याबाबत आरटीआय दाखल केली होती. याचे उत्तर देताना सरकारने याबाबतचा कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याचे म्हटले होते.
गांधींज्या हत्येनंतर देशाला रेडिओवरून माहिती देताना भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी देखील राष्ट्रपिता असा उल्लेख केला होता.