धोनीने फिल्म जगात घेतली उडी !

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी (ms dhoni) आणि त्याची पत्नी साक्षी सध्या चर्चेत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच ते आपली एक वेब सीरिज आणण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वी २०१९ मध्ये ‘Roar Of The Lion’ या डॉक्युमेंट्रीसोबत धोनीनं ‘धोनी एन्टरटेनमेंट’ या प्रोडक्शन कंपनीची सुरूवात केली होती.

हे वाचा : माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण

आता ही कंपनी आपली वेब सीरिज आणण्याची तयारी करत आहे. ही वेब सीरिज (web series) एका पुस्तकावर आधारित असेल जे अद्यापही प्रकाशित झालेलं नाही. आयएएनएसशी संवाद साधताना साक्षी धोनीनं (Sakshi Dhoni) या वेब सीरिजबद्दल माहिती दिली. मनोरंजन क्षेत्रातील संधीचं सोनं करण्याच्या धोनीच्या निर्णयावर तिनं आयएएनएसशी चर्चा केली.

“मी माझ्या विचारांवर आणि क्रिएटिव्हीटीवर बरंच लक्ष दिलं आहे. जेव्हा आम्ही ‘रोअर ऑफ द लायन’ तयार करत होतो, तेव्हा आम्हाला ही मनोरंजन क्षेत्रात (ott platform)प्रवेश करण्याची ही योग्य संधी आहे असं वाटलं,” अशी माहिती साक्षीनं यावेळी दिली.

ही वेब सीरिज पौराणिक साय-फाय स्टोरी असेल, असंही ती म्हणाली. या प्रोडक्शन हाऊसचं काम साक्षीच पाहत असते. परंतु कोणताही मोठा निर्णय ती महेंद्रसिंग धोनीच्या सल्ल्यानुसार आणि आपल्या टीमच्या सल्ल्यानुसारच घेते.

error: Content is protected !!