LOC जवळ पाकिस्तानच्या गोळीबारात दोन जवान शहीद, चार जखमी

एकाबाजूला पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर तणावाची स्थिती असताना, दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. जम्मू-काश्मीरच्या नौगाम सेक्टरमधील एलओसीजवळ पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

हे वाचा :- कर्मचाऱ्यांना मोबदल्याविना ओव्हरटाइम देता येणार नाही; सुप्रीम कोर्टाने फटकारले

पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले असून चार जण जखमी झाले आहेत. आज सकाळी गोळीबाराची ही घटना घडली. “कुपवाडाच्या नौगाम सेक्टरमध्ये गुरुवारी सकाळी पाकिस्तानकडून गोळीबार सुरु झाला. त्यांनी मोर्टारही डागले” असे श्रीनगर स्थित संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले.

सीमेपलीकडून झालेल्या या गोळीबारात दोन जवान शहीद झाले असून चार जण जखमी झाले आहेत असे कर्नल कालिया यांनी सांगितले. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पाकिस्तानच्या या गोळीबाराला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं जात आहे.

error: Content is protected !!