त्या लोकांचा प्लॅन ,मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळू नये

मुंबई : धनगर आणि आदिवासी समाजात जे भांडण लावतायेत, त्यांनी समजून घ्यावं, एसटी आरक्षण हे लोकसंख्येच्या आधारावर आहे. ज्यावेळी धनगर समाजाची लोकसंख्या मोजली जाईल, त्यानुसार आरक्षण दिलं जाईल, त्यामुळे आदिवासींच्या आरक्षणावर कुठेही परिणाम नाही. आदिवासींनी गैरसमज करण्याचं कारण नाही, असं पडळकर म्हणालेत.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं अशी जे मागणी करत आहेत, त्यांचा प्लॅन दिसतोय की, मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळू नये, असा आरोप गोपीचंद पडळकरांनी केला आहे.

समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जे काही करावं लागेल ते करणार. आरक्षणासाठी समाजाला जे लागेल त्यांच्यासोबत मी आहे असंही गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं.

error: Content is protected !!