त्यांचा एक आमदार तरी आहे का? NDAची ऑफर देणाऱ्या आठवलेंना पवारांचं प्रत्युत्तर

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी एनडीएमध्ये यावं. त्यांना सत्तेत वाटा मिळेल, अशी थेट ऑफर देणाऱ्या केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा शरद पवारांनी खरपूस समाचार घेतला. ‘आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक तरी आमदार निवडून येतो का? आठवले अधूनमधून मार्गदर्शन करत असतात. त्यांना संसदेत आणि संसदेबाहेरही कोणी गांभीर्यानं घेत नाही,’ असा टोला शरद पवारांनी लगावला.

शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शरद पवारांनी केंद्र सरकारसोबत यावं, असं आवाहन रामदास आठवलेंनी काल केलं होतं. पवार सोबत आल्यास राष्ट्रवादीला सत्तेतही वाटा मिळेल, असं ते म्हणाले होते. राज्य सरकारमधील पक्षांमध्ये नाराजी आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रेड सिग्नल दिला. त्यामुळे राष्ट्रवादी नाराज होती. कोरोना काळात काही निर्णय घेण्यात आले. त्या प्रक्रियेत स्थान देण्यात आलं नाही, अशी काँग्रेसची तक्रार होती, याकडे आठवलेंनी लक्ष वेधलं होतं.

error: Content is protected !!