मुंबई । अनुराग कश्यप यांनी अभिनेत्री पायल घोषवर अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सात दिवसांत त्याच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलाय
अंधेरी येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
अभिनेत्री पायल घोषच्या तक्रारीला आता सात दिवस झाले तरी कश्यप यांना चौकशीसाठीसुद्धा बोलावण्यात आलं नाही. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी योग्य कारवाई केल्यास नव्या कलाकारांचे कोणीही शोषण करणार नाही. त्यामुळे येत्या सात दिवसांत कश्यप यांना पोलिसांनी अटक करावी, असं आठवले म्हणालेत.