औरंगाबाद | मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षभरापासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कधी कोरडा, तर कधी अतिवृष्टी, तर कधी निर्सगाचा लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेती कशी करावी असा प्रश्न मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.
अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना अर्थिक मदत करुन बळीराजाला दिलासा द्यावा, असही बंब यांनी पत्रात नमूद केले आहे.