Maratha Arakashan: बैठकीत ठरली मराठा आरक्षण आंदोलनाची रूपरेषा

उस्मानाबाद: सुप्रीम कोर्टाने (suprime court) मराठा समाजाच्या आरक्षणाला (maratha reservation) स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान मराठा आरक्षणावरून  राज्यातील मराठा समाज पुन्हा आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत आहे.  उस्मानाबाद जिल्ह्यातही मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले असून याची सुरवात दि. ९ ऑक्टोंबर पासून आंदोलनाला सुरुवात होणार आहे. ९ ऑक्टोबरला तुळजापूर शहरात भव्य मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चात जिल्यातील मराठा समाज बांधवानी सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच १० तारखेला राज्य स्तरावर पुकारलेल्या महाराष्ट्र बंद (maharashtra close) मध्ये सहभाग आणि त्यानंतर जिल्यातील खासदार- आमदार यांच्या घरासमोर ढोल वाजून जनआक्रोश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यातील खासदार आमदारांच्या घरासमोर ढोल वाजवून जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार

मराठा समाजाने दिनांक 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या पुकारलेल्या महाराष्ट्र बंद मध्ये ही सहभाग घेऊन जिल्हा कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पुढील काही दिवसात जिल्ह्यातील खासदार आमदारांच्या घरासमोर ढोल वाजवून जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. त्याची तारीख  अद्याप ठरवण्यात आली नसून लवकरच एक कमिटी गठीत करून कमिटीद्वारे पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात येणार आहे. या सर्व आंदोलनानंतर हि समाजाला न्याय न मिळाल्यास पुढी काळात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे. आजच्या या बैठकीत उस्मानाबाद शहरासह तालुक्यातील तसेच जिल्हाभरातील मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.

आंदोलनाच्या लढ्याच्या तिसऱ्या पर्वाची सुरवात तुळजापूर शहरातून

या बैठकीत अनेकांनी आक्रमक आंदोलन करण्याचा मानस व्यक्त केला. मात्र मागे ज्याप्रमाणे लाखोंच्या संख्येने शांततेत मोर्चे काढले त्याच पद्धतीने सध्याचे आंदोलन हि करण्याच्या भूमिकेवर सर्वांचे एकमत झाले. आंदोलनाच्या लढ्याच्या तिसऱ्या पर्वाची सुरवात तुळजापूर शहरातून करण्यात येणार असून दि. ९ ऑक्टोबर रोजी तुळजापूर शहरात मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात जिल्हाभरातील बांधवांनी सहभागी होण्याच्या निर्णय घेण्यात आला.

पंतप्रधान नरेंद मोदी यांचाही निषेध करण्यात आला

सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यातील मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर येत आहे. राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यातही याच अनुषंगाने आज मराठा समाजाची बैठक बोलवण्यात आली होती. शहरातील छाया दीप लॉन्स येथे झालेल्या या बैठकीमध्ये जिल्हाभरातील शेकडो मराठा मराठा बांधव उपस्थित होते. यावेळी बैठकीमध्ये सहभागी अनेक तरुणांनी मराठा समाजाची बाजू न्यायालयात शासनाने योग्यरीतीने न मांडल्यामुळे शासनाचा निषेध केला.  तसेच नरेंद्र मोदी यांनीही छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील सर्व खासदारांच्या भेटीसाठी केलेल्या मागणीवर कुठलीच भूमिका न घेतल्यामुळे पंतप्रधान मोदी यांचाही निषेध करण्यात आला

error: Content is protected !!