Pankaja Munde: भाजप राष्ट्रीय सचिव पदी निवडीनंतर, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी आज (२६ सप्टेंबर) जाहीर झाली आणि पंकजा मुंडे यांना केंद्रात स्थान देण्यात आले. निवड झाल्यानंतर पंकजा मुंडे आपली प्रतिक्रिया नोंदवत पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची मी आभारी आहे. मला राष्ट्रीय कार्यकारिणीत जे स्थान देण्यात आलं आणि मला जे पद देण्यात आले तो मी माझा सन्मान समजते असेही त्यांनी म्हटले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्यात राष्ट्रीय मंत्री म्हणून पंकजा मुंडे व तावडे यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्रातून विजया रहाटकर व सुनील देवधर यांनाही राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर, खासदार यांची राष्ट्रीय प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदी नागपूरचे जमाल सिद्धिकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे

भाजपाच्या ‘मेरा अंगण, मेरा रणांगण’ या आंदोलनातून गायब होत्या पंकजा मुंडे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुरू केलेल्या ‘मेरा अंगण, मेरा रणांगण’ या आंदोलनामध्ये नाराज असलेले एकनाथ खडसे अंगणात उतरलेले दिसले होते. मात्र, भाजपा सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडे आणि त्यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे या दोन्ही बहिणी मात्र आंदोलनात सहभागी झाल्या नसल्याच्या चर्चांना उधाण आले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांनी आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचा कुठलाच फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला नसल्याने त्या भाजपाच्या आंदोलनात सहभागी झाले नसल्याने चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या.

error: Content is protected !!