डिजिटल प्रतिनिधी: जालना जिल्हा सामान्य रुग्णालयास प्राप्त कोरोना अहवालानुसार काल ( दि.६ ) गुरुवारी रात्री उशिरा आणखी २७ व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल २६२३ ( अँटीजेन टेस्ट सह ) कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या ८४ झाली आहे.
कोरोनाबाधित आढळून आलेल्या २७ रुग्णांमध्ये
भाग्य नगर – ०३ आणि गायत्री नगर,माऊली नगर,सिंधी बाजार परिसर,म्हाडा कॉलनी,टाऊन हॉल परिसर,इन्कम टॅक्स कॉलनी,पांगरकर नगर,थत्ते हॉस्पिटल परिसर,आझाद मैदान परिसर,शकुंतला नगर,नूतन वसाहत,रेल्वे स्टेशन रोड प्रत्येकी एक रुग्ण तर भोकरदन येथील जय भवानी नगर – ०३, आष्टी ता.परतूर – ०३,मासनपूर ता.भोकरदन – ०१,खासगाव ता.जाफराबाद – ०१, जवाहर कॉलनी अंबड – ०१,बानेगाव – ०१,सेलगाव ता.बदनापूर – ०१,देऊळगाव राजा – ०१ अशा एकूण २७ रुग्णांचा समावेश आहे.✍🏻