अरेरे! काय ही अवस्था? अनिल अंबानींना पत्नीचे दागिने विकावे लागले

मुंबई । रिलायन्स समुहाचे प्रमुख (एडीएजी) अनिल अंबानी यांच्यावर बँकावरील कर्ज थकवल्या प्रकरणी युनायटेड किंगडममधील न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या सुनावणी दरम्यान अंबानी यांनी आपण सध्या साधारण आयुष्य जगात असल्याचे सांगितले तसेच आपली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला पत्नीचे सोन्याचे दागिने विकावे लागले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

अंबानी यांनी चीनमधील तीन 4 हजार 760 कोटीचे बँकांकडून कर्ज घेतलं आहे. त्याची वसुली करण्यासाठी या बँकांनी लंडनमधील न्यायालयात अंबानी यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. त्यावर झालेल्या सुनावणीत अंबानी यांनी सध्याच्या आपल्या आर्थिक परिस्थितीबीबत माहिती दिली आहे. अनिल अंबनी म्हणाले की, मी एक सर्वसामान्य आयुष्य जगत असून सध्या माझा खर्च पत्नी टीना अंबानी करत आहे. तसेच मागील सहा महिन्यात पत्नीचे 9 कोटी 90 लाखांचे दागिने विकले आहेत. आता स्वतःजवळ काही किंमत ऐवज उरलेला नाही, अशी माहिती अनिल अंबानी यांनी न्यायालयाला दिली.

आपली आर्थिक हलाखी कथन करताना त्यांनी माध्यमांवर खापर फोडले आहे. माझ्या श्रीमंतीविषयी माध्यमांनी अफवा पसरवल्या, माझ्याजवळ कधीच रोल्स रॉयस ही आलिशान मोटार नव्हती. आताही केवळ एकच कार आपल्या सोबत आहे, असे अंबानी यांनी सांगितले. या सुनावणीत पत्नी टीना अंबानी यांच्या मालमत्तेचा तपशील मागण्यात आला. तसेच अनिल अंबानी यांना खासगी हेलिकॉप्टर , याॅट, लक्झुरी मोटार, लंडन, कॅलिफोर्निया आणि बिजिंगमधील शाॅपींगसंबधी प्रश्न विचारण्यात आले.

त्याआधीच्या सुनावणीत अंबानी यांच्या वकिल रॉबर्ट होवे यांनी मागच्या सुनावणीत युक्तिवाद करताना भारतातील दूरसंपर्क सेवा क्षेत्रातील घडामोडींमुळे अंबानी हे देशोधडीला लागले असल्याचा दावा केला होता. वकिलाने न्यायालयाला सांगितले की, दूरसंपर्क सेवा बाजारपेठेतील विपरीत घडामोडींममुळे अंबानी आता धनाढय़ नाहीत. त्यांच्याकडे बँकांचे कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोठे बंधू मुकेशचाही आधार नाही

मध्यंतरी एरिक्सन या स्वीडिश टेलिकॉम कंपनीचे ६० दशलक्ष पौंडाचे देणे दिले नाही तर तुरुंगात टाकण्याची तंबी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अनिलअंबानी यांना दिली तेव्हा मोठे बंधू मुकेश यांनीते पैसे देऊन कुटुंबाची लाज राखली होती. पण आता कुटुंबात कोणी मदत करायला तयार नाही, असं अनिल अंबानी यांनी स्पष्ट केले होते.

मायदेशात सुद्धा अंबानी अडचणीत

नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल (NCLT) ने अनिल धीरुभाई अंबानी ग्रुप (ADAG)चे मालक अनिल अंबानी यांच्या विरुद्ध दिवळखोरीची कारवाई सुरू केली आहे. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाकडून अनिल अंबानी यांनी कर्ज घेतले होते. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने २०१६ साली अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन आणि रिलायन्स इफ्राटेल या कंपन्यांना हे कर्ज दिले होते. या कर्जासाठी अंबानी यांनी १ हजार २०० कोटी रुपयांची पर्सनल गॅरेन्टी दिली होती. आता या दोन्ही कंपन्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे एसबीआयला मुंबई NCLTकडे अपील करावी लागली.

error: Content is protected !!