या कारणासाठी थेट अजित पवारांच्या घरासमोर आंदोलन

बारामती – उपमुख्यमंत्री पवार (Ajit Pawar) यांच्या सहयोग सोसायटी (Sahyog Society) या निवासस्थानाबाहेर प्रचंड पोलिस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोविड (Covid-19) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing), मास्क (Mask), सॅनिटायझरचा (Sanitizer) वापर हे नियम या आंदोलनात पाळले जात आहेत. कायदा व सुव्यवस्था त्याचबरोबर स्वतःची व सामाजिक स्वास्थ्याच जबाबदारी घेत हे आंदोलन केले जात असल्याचे मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले.

महत्वाचे : वाचा आता कोणत्या दिवसापासून लागू होंणार पेन्शन

सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर बारामतीतील मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) वतीने शनिवारी (दि.२६) सकाळी नऊ वाजता मराठा क्रांती मोर्चाने उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit pawar) यांच्या येथील सहयोग सोसायटी निवासस्थानाबाहेर ढोल बजाओ आंदोलन सुरु केले आहे. शहर व तालुक्यातून मोठ्या संख्येने मराठा समाज येथे एकवटला असून आरक्षणासाठी कमालीचा आक्रमण झाला आहे.

मराठा आरक्षणाला (Maratha Arakshan) स्थगिती दिल्याने समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. गत आठवड्यात क्रांती मोर्चाच्या वतीने प्रांताधिकाऱयांना निवेदन देत विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. मराठा (Maratha) आरक्षणावरील (supreme court) स्थगिती उठत नाही तोपर्यंत सरकारी नोकर भरती करू नये, ही प्रमुख मागणी करण्यात आली होती.

त्यानंतरही राज्य शासनाने राज्यात पोलिस भरती केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे तरुणांमध्ये खदखद आहे. त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन पवार यांच्या दारात होत आहे. शनिवारी सकाळी येथील पीएनजी चौकात एकत्र येत मराठा समाज पवार यांचे निवासस्थान असलेल्या सहयोगसमोर पोहोचला असून तेथे ढोल बजाओ आंदोलन केले जात आहे.

error: Content is protected !!