मराठी तरुणांचे लग्न (To get married) जुळवून देण्यात अग्रगण्य असलेली संस्था असलेल्या एका संस्थेच्या अभ्यासातून (Study) हे वास्तव पुढे आलंय. या संस्थेने आपल्या लाखो नोंदणीकृत युजर्सचा अभ्यास केला. त्यावरुन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या युझर बेसमध्ये 30% महिला तर 70% पुरूषांचा समावेश होता.
हे वाचा : सुटी सिगारेट व बिडी विकायला महाराष्ट्रात बंदी
मुला, मुलीसाठी जोडीदाराची निवड पांरपारीक रीतीने आई वडील (Mother father) किंवा घरातील जेष्ठ मंडळी करतात. मात्र अलिकडे हा ट्रेंड बदलत चालला आहे. आता बहुतांश मराठी तरुण, तरुणी लग्नाचा निर्णय स्वत:च घेत असल्याचे चित्र आहे. महत्वाचे म्हणजे 60 टक्के तरुण, तरुणींनी आपल्या जातीबाहेर लग्न करण्याला तयारी दर्शवली आहे. अहवालातील ठळक मुद्दे
– आजचा तरूण वर्ग लग्नाचा निर्णय स्वत:हून घेण्यास पसंती देतो.-76% तरूण स्वत: आपला मॅट्रिमोनी प्रोफाइल तयार करतात, केवळ 7% पालक किंवा त्यांची भावंड त्यांच्याकरता प्रोफाइल बनवतात
-55% महिला आणि 61% पुरूषांनी जातीबाहेरच्या जोडीदारासाठी तयारी दाखवली
परदेशात स्थळे शोधतांना प्रामुख्याने युएसए, जर्मनी, कॅनडा आणिप्रॉन्स या देशांना प्रेफरन्स दिला जातो
-26% महिला आणि 7% पुरूष आपला जोडीदार उच्च पद्धवीधर असावा अशी अपेक्षा करतात.
वर निवडतांना स्वत:चा व्यवसाय असणाऱ्यांना प्रथम प्राधान्य, त्यानंतर कार्यकारी अधिकारी, सुपरवायजरला पसंती
-वधू निवडतांना सॉफ़्टवेअर प्रोफेशनल्स आणि “कार्यकारी” पदावरील महिलांना पसंती
सर्वाधिक नोंदण्यांमध्ये राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आणि अहमदनगर शहरे आघाडीवर
-राज्याबाहेर बेंगलूरू, बेळगाव, हैद्राबाद आणि वडोदरा इथून सर्वाधिक लग्नासाठी नोंदणी