बीड :- शेतीच्या वादावरून एकास मारहाण करण्यात आल्याची घटना आज सकाळी बीड तालुक्यातील वासनवाडी येथे घडली आहे. सदरील जखमी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सुदर्शन धोंडीराम खरसाडे हा तरूण आज सकाळी आपल्या शेतामध्ये मशागत करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याचा इतरांशी वाद निर्माण झाला. या वादातून त्यास मारहाण करण्यात आली. त्याच्या डोक्यात जखम झाली असून त्यास उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.