राष्ट्रवादी आणि भाजपने केली हातमिळवणी, शिवसेनेला मोठा धक्का

राज्यातील कोरोनाची (corona) परिस्थिती आणि लॉकडाउनमुळे (Lockdown) रखडलेली अहमदनगर (Ahmadnagar) महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीला अखेर मुहूर्त लागला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ही निवड प्रक्रिया लॉकडाउनमुळे रखडली होती. अखेर ऑनलाइनद्वारे ही निवड प्रक्रिया आज पार पडणार आहे.

हे वाचा : उपमुख्यमंत्र्यांना आधी झाला कोरोना आता झाला डेंग्यू

शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी तिन्ही पक्ष एकत्र आल्याचे पाहण्यास मिळाले. मात्र, अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत वेगळेच चित्र पाहण्यास मिळाले. महापालिकेच्या स्थायी सभापतीच्या निवडणुकीत चक्क राष्ट्रवादी (Rashtrawadi) आणि भाजप (BJP) एकत्र आले.

21 ते 24 सप्टेंबरदरम्यान उमेदवारांना अर्ज वितरण करून दाखल केले. त्यानंतर आज सकाळी 11 वाजता निवडणूक विशेष सभा होणार आहे. त्यानंतर अर्जाची छाननी होणार आहे. पण, त्याआधीच शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजपमध्ये सामना रंगला आहे. भाजप नगरसेवक मनोज कोतकर राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. त्यामुळे अहमदनगर महानगरपालिकेत भाजपा राष्ट्रवादीची सत्ता आली. संख्याबळ जास्त असतानाही शिवसेना सत्तेपासून दूरच (politics news)आहे.

पहिली स्थायी समिती जानेवारी 2019 मध्ये अस्तित्वात आली होती. एक वर्ष पूर्ण झाल्यावर चिठ्ठ्या काढून 8 सदस्य 31 जानेवारी 2020 रोजी निवृत्त झाले. यामध्ये सेनेचे व राष्ट्रवादीचे प्रत्येकी 3 तसेच काँग्रेस व भाजपचा प्रत्येकी एक नगरसेवक होता. त्यांच्या या रिक्त जागी अशाच पक्षीय सदस्य संख्येनुसार नवे सदस्य नियुक्त होणार होते. पण फेब्रुवारी महिन्यात प्रभाग ६ अ या जागेच्या पोटनिवडणुकीत सेना उमेदवाराचा पराभव होऊन भाजपच्या पल्लवी जाधव विजयी झाल्याने मनपातील पक्षीय बलाबल बदलले आणि सेनेची एक जागा कमी झाली.

सेनेकडे 24 पैकी 23 जागा राहिल्यात. तर भाजपची संख्या एकने वाढून 15 वर गेली. त्यामुळे स्थायी समितीत सेनेचे संख्याबळही एका जागेनं कमी झाली असून 5 वर आली आहे. तर भाजपची 3 जागेवरून 4 वर पोहोचली आहे. त्यामुळेच आता 8 जागांमध्ये राष्ट्रवादीचे 3, सेना व भाजपचे प्रत्येकी 2 व काँग्रेसचा एक सदस्य नियुक्त होण्याची चिन्ह आहे. पण, भाजपने राष्ट्रवादीला मदत केल्यामुळे हे गणित आता बिघडले आहे.

error: Content is protected !!