नांदेड, – मुदखेड पोलीस ठाण्या च्या हद्दीत असलेल्या श्री मातासाहेब गुरूद्वारा परिसरात बंदुका वापरून वादग्रस्त प्रकरण केले गेले. मुदखेड ते नांदेड मार्गवर गोळीबार प्रकरण सर्वदूर गाजत आहे. आणि याचा संबंध असलेले नागरिक भयग्रस्त झाले होते. दि. ५ रोजी पुन्हा मुदखेड तालुक्यात एक प्रकरण घडले. मुदखेड चे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी नारायण शिंदे यांनी धाडसी कारवाई करून दोन आरोपींना पीस्टल बंदुक व गोळी सह अटक केली.
या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर १५५/२०२० कलम ३/२५ आर्म एक्ट ची फिर्यादी गुलाब सिंग पुरण सिंग सरदार (वय ३८ ) सेवादार गुरुद्वारा माता साहेब देवांंजी बुडा दल मुगट तालुका मुदखेड यांच्या अर्जावर आरोपी क्रमांक 1) ( वय २४) राहणार गुरुद्वारा गेट क्रमांक चार नांदेड, आरोपी क्रमांक २) राहणार हिंगोली नाका गोविंद नगर नांदेड. हे दिनांक ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी माता साहेब देवांची गुरुद्वारा मुगट येथील बाबाजीच्या निवासस्थानाच्या समोर प्रांगणात येऊन आम्हाला बाबाजी ला भेटायचं आहे असे म्हणून त्यांनी त्यांच्याजवळील पिस्टल दाखवली होती ते आरोपी पिस्टल व राऊंड बाळगलेले सह ताब्यात घेतले. एक आरोपी तेथून पळून गेला होता त्यास शोध घेत तात्काळ ताब्यात घेतले आहे.