दिलासादायक! सिरम इन्स्टिट्यूटने बनवली कोरोना लस; उत्पादनाला सुरूवात

पुणे । जगातील सगळ्यात मोठी लस निर्माण करणारी भारतीय कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोरोना लसीच्या दिशेनं मोठी पाऊलं उचलताना दिसून येत आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अमेरिकेतील कंपनी कोडाजेनिक्ससह लस तयार करण्याचा करार केला होता. ही लस तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. ही लस नाकाद्वारे दिली जाते. कोडाजेनिक्सकडून एक निवेदन देण्यात आलं आहे. या निवेदनातून  याबाबत माहिती देण्यात आली आहे. या लसीचे नाव CDX-005 आहे.  या लसीच्या चाचणीसाठी प्राण्यांवर प्री क्लिनिकल ट्रायल पूर्ण केले होते. या वर्षाच्या शेवटापर्यंत UK मध्ये या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात होणार आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार प्री क्लिनिकल अभ्यासात या लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

कोडाजेनिक्सचे सीईओ जे रॉबर्ट कोलमॅन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ”सिरम इंन्स्टिट्यूटची टेक्निक आणि आर्थिक मदत पाहता या वर्षीच्या शेवटापर्यंत लसीच्या वैद्यकिय चाचण्या पूर्ण होतील अशी आशा आम्हाला आहे. तसंच लसीवर वेगानं काम सुरू होऊ शकतं. ही लस तयार करण्यासाठी सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला आहे. व्हायरसचं म्यूटेशन पाहता SARS-CoV-2 जीनोम्सना रिकोड करतो. या लसीमुळे रोगाशी लढण्याची क्षमता नसतानाही शरीरात मजबूत टी सेल्स आणि एंटीबॉडी तयार  करता येतात.”

पुढे त्यांनी सांगितले की, ”इतर लसींपेक्षा ही लस खूपच वेगळी आहे. सध्या जी लस तयार केली जात आहे ती एडीनोव्हायरसवर आधारित आहे. त्यामुळे स्पाईक प्रोटिन्सना टार्गेट करता येऊ शकतं. CDX-005 ही लस इंजेक्शनच्याऐवजी नाकाद्वारे दिली जाणार आहे. ही लस रुग्णांसाठी परिणामकारक आणि सुरक्षित ठरेल.” सिरम इन्स्टिट्यूटला ही  लस तयार करण्यासाठी भारताच्या (DBT) कडून मंजूरी मिळाली आहे.  याव्यतिरिक्त सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडीया एक्स्ट्रा जेनेका कंपनीच्या सहयोगाने ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या कोरोना लसींच्या चाचण्यांवर काम करत आहेत. 

error: Content is protected !!