प्रतिनिधी – घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथे एकाच कुटुंबातील 11 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने गावासह परिसरात खळबळ उडाली असून आरोग्य विभाग गावात ठाण मांडून आहे. भोगगावातील एका 45 वर्षीय व्यक्तीला लक्षणे दिसून आल्याने शनिवार 1 ऑगस्ट रोजी त्याची तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याच्या संपर्कातील हायरिस्क 21 जणांना घनसावंगीच्या अलगिकरन कक्षात दाखल केले होते. या 21 जणांची तपासणी केली असता बाधित व्यक्तीच्या निकट संपर्कातील त्याची पती, दोन मुले, आई-वडील, भावासह त्याची पत्नी व तीन मुलं असे बाधित व्यक्तीसह एकूण 11 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
क्वारंटाईन केलेल्या इतर 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांची सुट्टी करण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नागेश सावरगावकर यांनी सांगितले. दरम्यान भोगगाव येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात लागण झाल्याने त्यांच्या निकटच्या संपर्कात आलेल्यांची गुरुवारी भोगगाव येथेच रॅपिड अँटीजन टेस्ट घेण्यात येत आहेत.
गुरुवारी दुपारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नागेश सावरगावकर यांनी भोगगाव येथे भेट देऊन आढावा घेतला आहे.दरम्यान तीर्थपुरी पासून जवळ असलेल्या अंबड तालुक्यातील साडेगाव येथील एका 80 वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीचा बुधवारी जालना येथील खाजगी दवाखान्यात मृत्यू झाला असल्याची माहिती अंबड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास रोडे यांनी दिली आहे. तेथील हायरीस्क असलेल्या 15 जणांना अंबड येथे क्वारंटाईन केले आहे. तसेच तीर्थपुरी येथे एका साखर कारखान्याच्या कर्मचार्याला कोरोनाची लागण झाल्याने तीर्थपुरीत शुक्रवारपासून तीन दिवसाचा जनता कफर्युु पाळण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतला असून गावात फवारणी करून सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे