कंगना ऑफिस तोडफोड: मला याचिकेत प्रतिवादी करण्याचा विचार हास्यास्पद : संजय राऊत


मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयात पाडकाम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ‘सामना’मध्ये ‘उखाड दिया’ अशा मथळ्याखाली बातमी प्रकाशित झाली. त्याच बातमीवर बोट ठेवत कंगना रनौतने शिवसेना खासदार संजय राऊत यांना कोर्टात खेचण्याची तयारी केली आहे. मात्र खटल्यामध्ये प्रतिवादी करण्याचा विचार हास्यास्पद असल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले की, “हे हास्यास्पद आहे.

न्यायालयाच्या आदेशाला किंवा निर्णयाला झुकून ‘येस मिलॉर्ड’ म्हणण्याची परंपरा आहे. ती आताही राखली जाईल. बेकायदेशीर बांधकाम झालं असेल तर ते तोडण्याचा अधिकार मुंबई महापालिकेला आहे. मुंबई महापालिका स्वतंत्र संस्था आहे. त्यांची स्वत:ची यंत्रणा आहे. राज्य सरकार, राजकीय नेते किंवा खासदार त्यांच्यात हस्तक्षेप करु शकत नाहीत. बेकायदेशीर बांधकाम करुन कांगावा करायचा आणि त्यात मला ओढून राजकारण करायचं. माझ्या वक्तव्यामध्ये एवढी ताकद असेल तर चीनने केलेलं बांधकाम तोडलं असतं. काही महिन्यांपासून महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुनियोजित तयारी सुरु आहे. महाराष्ट्राला बदनाम करायचं, मुंबई बदनाम करायचं, मराठी लोकांना बदनाम करायचं याचा षडयंत्र पदड्यामागे रचलं जात आहे.”

कोर्टातली लढाई आमच्यासाठी नवी नाही : राऊत
आम्ही कोणतीही लढाई लढण्यास तयार आहोत. कोर्टातली लढाई ही आमच्यासाठी नवी आहे का? 160 खटले माझ्यावर सुरु होते. 1992 च्या दंगलीत, बाबरी मशिदीच्या प्रकरणात, मराठी माणसांच्या लढ्यामध्ये महाराष्ट्राचं असं कोणतंही कोर्ट नाही जिथे संजय राऊतांवर खटले दाखल झाले नाहीत. कोर्टकचेऱ्या होतच असतात, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

error: Content is protected !!