आयकर नोटिसवर शरद पवारांची प्रतिक्रिया

मुंबई : आयकर विभागाच्या नोटीसबाबत शरद पवार म्हणाले की, “नोटीस आधी मला आली, आता सुप्रियाला येणार आहे असे कळलं, चांगली गोष्ट आहे. सुप्रियाला काल संध्याकाळी नोटीस येणार होती. संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे याचा आनंद आहे. मला काल नोटीस आली असून काही बाबतीत स्पष्टीकरण मागवलं आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन मला ही नोटीस आली आहे. त्याचं उत्तर लवकरच मी देईन, कारण उत्तर दिलं नाही तर दिवसाला 10 हजारांचा दंड असल्याचा उल्लेख नोटीसमध्ये आहे. 2009, 2014 आणि 2019 या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस आहे.”

इतकंच नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे तसंच सुप्रिया सुळे यांनाही नोटीस मिळल्याचं पवारांनी सांगितलं. राजकीय विरोधकांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवून केंद्र सरकार आपला अजेंडा राबवत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी कृषी विधेयकावरुन राज्यसभेत झालेला गोंधळ, खासदारांचं निलंबन याविषयी भाष्य केलं. तसंच उपसभापती हरिवंश यांच्यावरही टीका केली. निलंबित खासदारांच्या समर्थनार्थ आज दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचं शरद पवारांनी जाहीर केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!