दीपिका पदुकोणची मॅनेजर सापडली ड्रग्ज प्रकरणात

एनसीबी सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदी आणि टॅलेंट मॅनेजर जया साहा यांची चौकशी करत आहे. जया साहाच्या चॅटमधून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं उघड झाली आहेत. दीपिकाची मॅनेजर करिश्मा आणि जया यांच्यात ड्रग्सविषयी बोलणं झाल्याचं चॅटमधून उघडकीस आल्याचं म्हटलं जातंय.

अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशला अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) समन्स बजावले आहेत. ड्रग्ज प्रकरणी दीपिकाच्या मॅनेजरला समन्स बजावण्यात आले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्जच्या अँगलबाबत एनसीबी तपास करत आहे. रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर या तपासात आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समोर आली. सुशांतची मॅनेजर जया साहाच्या चौकशीदरम्यान दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशचंही नाव समोर आलं. करिश्मासोबतच KWAN टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव चितगोपेकर यांनासुद्धा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत.

रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांच्या अटकेनंतर एनसीबीने आता ड्रग्ज प्रकरणातील अन्य लोकांचीही चौकशी करण्याची तयारी केली आहे. ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) ही नावं समोर आली आहेत. व्हॉट्स अॅप चॅटमध्ये ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!